test

About Us

ओम सद्गुरु समता गृहनिर्माण संस्था असोशिएशनची स्थापना दोन्ही गृहनिर्माण संस्था ओम सद्गुरु गृहनिर्माण संस्था व समता गृहनिर्माण संस्था याची एकीकरण करून निर्माण झालेली संस्था आहे सदर असोशिएशन या माध्यमातून दोन्ही संस्थेचा पुनर्विकास हाच एकमेव ध्येय असून सर्व सभासदांना चांगल्या दर्जाची सदनिका मिळावी ही एकमेव अपेक्षा आहे.सभासद बंधू-भगिनींनो आपल्या या दोन्ही गृहनिर्माण संस्था या सिडकोच्या एल.आय.जी. स्कीम मधील असून सिडकोची सदर योजना 1987 ची असून अल्प उत्पन्न गटामधील लोकांना स्वतःचे हक्काचे निवासस्थान असावे अशी असून सदर योजनेअंतर्गत सिडको ने गृह प्रकल्प उभा करून लॉटरी पद्धतीने 1995 साली लोकांना वाटप केले असून प्रत्येक सोसायटीमध्ये 136 भागधारक असून दोन्ही संस्थेमध्ये मिळून 272 सदनिका आहेत.

त्याचे भागधारक यांना प्रदान करण्यात आले आहे. परंतु सिडकोकडून वाटप झालेल्या इमारतीची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असून या ठिकाणचे लोक आपला जीव मुठीत घेऊन राहतात आणि म्हणून ओम सद्गुरु गृहनिर्माण संस्थेने पुनर्विकासासाठी जाण्याचे निश्चित केले त्यासाठी 2019 च्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये पुनर्विकासासाठी ठराव मंजूर करून घेण्यासाठी धोरणात्मक कामकाज केले त्यादरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेकडे सदर संस्थांना संरचनात्मक अहवाल structural audit करण्याचे आदेश दिल्याने दोन्ही संस्थेने ऑडिट करून घेतले त्यानुसार दोन्ही संस्था नवी मुंबई महानगर पालिकेच्या वर्गवारीनुसार C-1 म्हणजेच अति धोकादायक घोषित करण्यात आल्या असून सदर संस्थेचा पुनर्विकास योग्य मार्गाने व्हावा म्हणून दोन्ही संस्थेने मिळून पीएमसी म्हणून अर्बन अनालाईज अँड सोल्युशन याची निवड संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये केली व पुनर्विकासासाठी जाणे क्रम प्राप्त झाल्याने सभासदाने आपले सहमती पत्रक संस्थेला दिले. त्यानंतर दोन्ही संस्थांनी आपापले लीज डिड करून घेतले. दोन्ही गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास योग्य दिशेने व चांगल्या

दर्जाचा व्हावा म्हणून दोन्ही संस्थेमधून निवडक सदस्य निवडून असोशिएशन बनविण्यात आली .त्या असोशिएशनच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सदर असोसिएशनवर 15 सदस्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष आनंद खरात सचिव तानाजी पडळकर खजिनदार म्हणून प्रमोद कालेकर यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे संतोष चाळके उपसचिव जयवंत लाड उपाध्यक्ष तर प्रभाकर माने उपखजिनदार म्हणून निवडले गेले. श्री रमेश देवरे, जमिल अहमद, विजय वेंगुर्लेकर, ज्ञानेश्वर कीरवे व योगेश कदम, बाळासाहेब गर्जे व मारुती मोरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली

Our Team

Mr. Anand Vaman Kharat
Chairman
Mr. Jaywant Jayram Lad
Voice Chairman

Our Core Team

Mr. Tanaji Salba Padalkar
Secretary
Mr. SantoshP. Chalke
Voice Secretary
Mr. Pramod Maroti Kalekar
Treasurer
Mr. Prabhakar Ananda Mane
Voice Treasurer

Members

Mr. Ramesh Shivram Devre
MEMBER
Mr. Dnyaneshwar Maroti Kirve
MEMBER
Mr. Jamil Ahmad
MEMBER
Mr. Vijay Mohan Vengurlekar
MEMBER
Mrs. Shipra Rajiv Goel
MEMBER
Mr. Maroti Vitthal More
MEMBER
Mr. Balu Sahdev Garje
MEMBER
Mrs. Popatrao Vinayak Kale
MEMBER
Mr. Yogesh Maroti Kadam
MEMBER

Members

Mr. Madhukar Suryavanshi
MEMBER
Mr. Jagnath Kothavale
MEMBER

Our Projects